बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘योगी आदित्यनाथ आम्हाला देता का?’; ऑस्ट्रेलियाच्या खासदाराकडून योगींचं कौतुक

लखनऊ | काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित रूग्णांचे मृतदेह तरंगताना सापडले होते. यावरून उत्तर प्रदेश सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. कोरोना महामारीत उत्तर प्रदेश सरकार आकडे लपवत असल्याचा आरोप तज्ज्ञ संख्यिकी आणि विरोधकांनी केला होता. त्यातच आता ऑस्ट्रेलियाच्या एका खासदाराने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे.

कोरोना महामारीच्या व्यवस्थापनासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं आता जागतिक स्थरावर कौतुक होताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचे खासदार ‘क्रँग केली’ यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे कौतुक केलंय. त्यासोबत त्यांनी भारतातील कोविड डाटा देखील शेअर केला आहे. त्यात उत्तर प्रदेश आयव्हरमॅक्टिनच्या चाॅम्पियन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘आपल्या राज्यात नैराश्याची स्थिती निर्माण झाली आहे. असा एखादा मार्ग आहे का, की ते त्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्याला काही दिवसांसाठी देऊ शकतील. जेनेकरून ते आपल्याला आयव्हरमॅक्टिनच्या तुटवड्यातून बाहेर काढू शकतील’, असं क्रँग केली म्हणाले आहेत. गेल्या 30 दिवसांत भारतातील 17 टक्के लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात 2.5 टक्के मृत्यू झाले आणि एक टक्क्यापेक्षाही कमी कोरोना केसेस समोर आल्याचं देखील त्यांनी आकडेवारीतून सांगितलं.

दरम्यान, त्याच बरोबर क्रँग केली यांनी महाराष्ट्राची देखील आकडेवारी मांडली आहे. महाराष्ट्रात भारतातील 9 टक्के लोकसंख्या आहे आणि 18 टक्के कोरोना केसेस होत्या आणि एकूण मृत्यूंपैकी पंन्नास टक्के आकडेही येथेच होते, असंही त्यांनी शेअर केलेल्या ग्राफ्समधून सांगितलं आहे. क्रँग केली यांच्या ट्विटनंतर अनेकजण आदित्यनाथ यांच्यावर हास्यस्पद टीका होत आहेत, तर काही जण योगींचं कौतूक करताना दिसत आहेत.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

सहकार खातं शहांकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत

रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले…

लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार!

‘मी अभिनेता आहे पाॅर्नस्टार नाही’, किसींग सिनमुळे पारसचा वेब सिरीजला नकार

“…म्हणून महाराष्ट्रातील भाजपचा सहकारावर राग असणं स्वाभाविक”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More