बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसलेंची ‘सदिच्छा दूत’ म्हणून निवड

मुंबई | महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले रणजितसिंह डिसले यांनी गेल्यावर्षी सप्टेंबर 2020 मध्ये ग्लोबल टीचर अॅवार्ड जिंकला होता. हा पुरस्कार जिंकल्यावर त्यांनी पुरस्काराची 7 कोटींची रक्कम शिक्षण प्रसारासाठीच वापरण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या कार्यांची चर्चा जगभरात केली जात आहे. त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमाची दखल आता जगभरात घेतली जात आहे. त्यातच आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रणजितसिंह डिसले गुरुजींची सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या वतीने ही नेमणूक करण्यात आली आहे. त्याच्या सुलभ कामाची दखल आता राज्य सरकारनं घेतल्यानं त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

रणजितसिंह डिसले यांचे नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी हाती घेतलेले उपक्रम नव उद्योजकांना प्रेरणादायी करणारे ठरतील, म्हणूनच हे उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावेत याच हेतूने त्यांची सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. तळागाळातील विद्यार्थी, नव उद्योजक, प्राध्यापक, स्टार्टअप यांच्या पर्यंत योजनांचा प्रसार डिसले गुरूजी करणार आहेत. याआधी डिसले गुरुजींच्या नावाने परदेशात शिष्यवृत्ती देखील सुरू केली गेली आहे.

दरम्यान, रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यांच्या या जागतिक कार्याच्या अनुभवाचा फायदा राज्यातील शिक्षकांना देखील व्हावा, यासाठी डिसले गुरुजींची नियुक्ती केली गेल्याचं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

‘माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळा’; नव्या मंत्र्यांना नरेंद्र मोदींनी केल्या ‘या’ सूचना

‘…तर मी पुन्हा येईन’; भर कार्यक्रमात संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

रस्त्यावर ‘वर्दी उतरव’ म्हणत तरूणाची पोलिसांसमोर मुजोरी; अटकेनंतर ढसाढसा रडला

एकनाथ खडसेंची तब्बल 9 तास ईडी चौकशी; चौकशीला खडसेंचा सकारात्मक प्रतिसाद

…म्हणून त्या 12 मंत्र्यांचा राजीनामा घेतला- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More