गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा आटापिटा

पणजी | गोव्यामध्ये सत्ताबदल व्हावा यासाठी राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी आटापिटा चालवला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन करावी, यासाठी आलेमाव यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

 चर्चिल आलेमवा यांना 2017 मध्ये काँग्रेसने तिकीट नाकारल्यानं त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळवलं आणि ते दक्षिण गोव्यातील बाणावली मतदारसंघातून निवडून आले. सध्या मुख्यमंत्री पर्रीकर हे आजारी असल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे गोवा विधानसभेत भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आलेमाव यांचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान,  काँग्रेसकडे स्वत:चे सोळा आमदार आहेत. सरकारमधील एक जरी घटक पक्ष फुटला व काँग्रेसला येऊन मिळाला तर काँग्रेसची सत्ता येऊ शकते, असं आलेमाव यांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवारांनी सांगीतल्यास श्रीनिवास पाटील उदयनराजेंच्या विरोधात लढणार!

-डीजेला परवानगी न दिल्यास मुर्ती विसर्जन करणार नाही; गणेश मंडळांचा निर्णय

-भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; महिला सभापतीलाच धमकावलं

-अजितदादा, तुम्हाला इथली खुर्ची देतो, पण मुंबईतील नाय- गिरीश बापट

-उदयनराजेंचा शरद पवारांच्या गाडीत बसण्याचा प्रयत्न, चूक लक्षात आल्यावर…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या