बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देव तारी त्याला कोण मारी! धावत्या रेल्वेमध्ये चढताना महिलेचा तोल गेला अन्…

मुंबई | मुंबईतील वसई रेल्वे स्थानकावर झालेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रेल्वे पोलिसांनी एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. मात्र तरी संबंधित महिलेला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांचं कौतुक केलं जात आहे.

संबंधित महिलेचं नाव प्रमिला मारु असं आहे. प्रमिला या हैद्राबाद येथील रहिवासी आहेत. रेल्वेमधून जात असताना वसई रेल्वे स्थानकावर प्लॅटफाॅर्म क्र. 7 वर ट्रेन थांबली होती. यावेळी प्रमिला खाली उतरल्या होत्या आणि पुन्हा रेल्वेमध्ये बसण्याआधीच रेल्वे सुरु झाली. त्यामुळे त्या चालू रेल्वेमध्ये चढायला गेल्या.

धावत्या रेल्वेमध्ये चढत असतानाच प्रमिला यांचा तोल गेला. त्या रेल्वे आणि प्लॅटफाॅर्मवरील अंतरात अडकल्या. एवढ्यातच वसई रेल्वे पोलिसांनी तातडीने महिलेकडे धाव घेतली आणि तिचे प्राण वाचवले. मात्र प्रमिला यांच्या कंबरेला दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचं धाडस करु नका, अशी सूचना वारंवार रेल्वे प्रशासन देत आहे. धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचं नको ते धाडस करुन अनेक जण जीवाला मुकतात. त्यामुळे कोणता जरी प्रसंग घडला तरी धावत्या रेल्वेमध्ये चढू नका, असं देखील रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे.

 

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलिसांनी किरीट सोमय्यांना रेल्वेतून उतरवलं, राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता

…म्हणून पोलीस आयुक्तांनी मानले पुणेकरांचे आभार!

पहिला घोटाळा बाहेर काढताच दवाखान्यात गेले, दुसरा काढला तर….- किरीट सोमय्या

किरीट सोमय्यांना कोल्हापूरच्या वेशीवरच अडवलं जाणार?, जिल्हा प्रशासनाने दिले जमावबंदीचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More