बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवाची सावली! उद्यान एक्सप्रेससमोर झोपून देखील महिला जिवंत

मुंबई | देव तारी त्याला कोण मारी, अशा अनेक घटना आपण पाहतो. कधी-कधी ह्रदयाचा ठोका चुकवणारी घटना असते आणि अनर्थ होता-होता टळतो. असाच काहीसा प्रकार मुंबईमधील डोंबिवली येथे झाला आहे. येथील एक महिला उद्यान एक्सप्रेसच्या रेल्वे रुळावर झोपली, ट्रेन देखील आली, मात्र सुदैवाने महिला वाचली.

डोंबिवलीतील श्रुती विशाल माळवे नावाची महिला मानसिकदृष्ट्या नाजूक असल्याने घरातील तणावामुळे ती रेल्वेच्या ट्रॅकवर येऊन झोपली होती. अशातच समोरुन ट्रेन आली असता रेल्वे देखील अचानक महिलेच्या अलीकडेच थांबली. यामुळे या महिलेचा जीव जाता-जाता राहिला. संबंधित घटना ही गुरुवारी घडली आहे.

ही घटना 9 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास डाऊन ट्रॅकवर ही घटना घडली. यादरम्यान तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. महिलेची चौकशी केल्यानंतर तिने आपलं नाव श्रुती माळवे असं सांगितलं आहे. यानंतर महिलेने सांगितलेल्या पत्यावर पोलिसांनी तिला नेऊन घरतील व्यक्तींशी चौकशी करुन तिला घरी सोडण्यात आलं आहे.

दरम्यान, घरातील व्यक्तींशी चौकशी वेळी घरतल्यांना श्रुतीशी काही तक्रार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर श्रुतीची मानसिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून नाजूक असून ती अनेक वेळा घरातून निघून गेली आहे. अशातच ती घरातील तणावामुळे ती आज देखील बाहेर गेली असल्याचं तिच्या आईने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या निकालाची तारीख जाहीर

आनंदाची बातमी! पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट लहान मुलांना ‘या’ महिन्यात लस देण्यासाठी तयार

“या देशात लोकशाही आहे, दंडुकेशाही चालणार नाही”

आश्चर्यकारक! मेलेल्या मुलाला कवटाळून आईचा आक्रोश अन् क्षणातच….

‘या’ ठिकाणी मातीत सापडत आहेत हिरे; हिरे शोधायला हजारो लोकांची गर्दी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More