देश

हिंदू महासभेने सुरू केलेली गोडसे ज्ञानशाळा दोन दिवसांतच बंद, प्रशासनाने ठोकले टाळे

भोपाळ | ग्वाल्हेर येथे अखिल भारतीय हिंदू महासभेने गोडसे ज्ञानशाळा नावाचं वाचनालय सुरू केलं होतं. दोन दिवसांतच प्रशासनाने गोडसे ज्ञानशाळा हे वाचनालय बंद केलंय.

कायदा-सुव्यवस्था कायम रहावी यासाठी जिल्हाप्रशासनाने ही कारवाई केली आहे. वाचनालयातील साहित्यही जप्त करण्यात आलं आहे.

जिल्हा दंडाधिका्यांनी परिसरात कलम 144 लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे वाचनालय बंद करण्यात आलं, अशी माहिती ग्वाल्हेरचे पोलीस अधिक्षक अमित संघी यांनी दिली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या नावानं उघडलेल्या या वाचनालयामुळे परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं.

थोडक्यात बातम्या-

सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ‘या’ गावांना निवडणूक आयोगाचा झटका!

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीकडून अटक!

‘एकदा सत्य बाहेर आलं की…’; धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

‘शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर…’; चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता ‘या’ विभागाची सांभाळणार जबाबदारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या