गोकुळच्या सभेत जोरदार गोंधळ; एकमेंकांवर चप्पलांची फेकाफेकी

कोल्हापूर | गोकुळ दूध संघांची सर्वसाधारण सभा ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने भिडल्याने प्रंचंड गोंधळ झाला. तसंच एकमेंकांवर चप्पलांची फेकाफेकीही झाली.

पहाटेपासूनच सत्ताधाऱ्यांनी ठरावधारकांना सभास्थळी आणून मोठी जागा व्यापली होती. विरोधक येईपर्यंत सभागृहाचा 70 टक्‍के भाग व्यापलाने विरोधकांना बसण्यासाठी सभागृहाच्या शेवटी जागा ठेवण्यात आली होती. मात्र विरोधकांनी थेट स्टेजकडेच कूच केल्याने सत्ताधाऱ्यांची गडबड सुरु झाली.

दरम्यान, रोधक आक्रमक झाल्याचे पाहून चेअरमननी ठराव नंबर एक असे म्हंटल्यानंतर समर्थकांकडून मंजूर तर विरोधकांकडून नामंजूर अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे अवघ्या तीन मिनीटात ही सभा आटोपण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुमच्याबद्दल मी शरद पवारांना सांगणार; डाॅ. लहानेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खडसावलं!

-भाजप नेते हिंदू तरूणींवर बलात्कार करतात; अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप

-पवारांच्या मुक्कामाच्या ठिकाणात पुन्हा बदल; विश्रामगृहावरच होणार पवारांची खलबतं

-हरामांचं राज्य असताना ‘रावण’ लिहिला- ज्ञानेश महाराव

प्रकाश आंबेडकरांना MIM चालतो, मग RPI चे इतर गट का चालत नाहीत?