मुंबई | कोरोनामुळेे मागील वर्षात सोन्याच्या किंमती आभाळाला पोहचल्या होत्या. कोरोनाच्या अचानक झालेल्या उद्रेकामुळे शेअर बाजार खाली आला. भारताबरोबर अमेरिकेत देखील हीच परिस्थिती कायम होती. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. याचा परिणाम म्हणून सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती.
सोन्याच्या दरातील गेल्या वर्षभरातल्या झालेल्या चढ-उतारानंतर आता पुन्हा सोन्याचे दर खाली आहेत. कोरोना काळात 56,000 वर गेलेली किंमत पुन्हा आता 46,500 वर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या एका महिन्यात सोन्याची किंमत 3,000 ने खाली आली आहे. या आठवड्याच्या सुरवातीला सोन्याचा दर 47,000 वर होता. पण मंगळवारी सोने बाजार उघडताच किंमत थेट 500 रूपयांनी खाली आली आणि 46,500 वर स्थिर झाली.
जानेवारीत कोरोना आकडेवारी कमी होतं होती त्या दरम्यान सोन्याची किंमत 51,000 वर आली होती. त्यानंतर दर सातत्याने कमी होत आहेत.
डाॅलरचे दर आणि आयात शुल्क कमी झाल्याचा परिणाम सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तुंच्या किंमतीवर झाला आहे. हे दर पुन्हा किंचीत वर जाऊन खाली येण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याची किंमत स्थिर नसल्याने किंमतीत दररोज चढ-उतार होताना दिसत आहे.
थोडक्यात बातम्या-
“…हे बेणं म्हणजे 2029 चा आमदारच म्हणा ना”
धक्कादायक! मुंबईच्या रस्त्यावर कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण फिरतांना आढळले
शरद पवारांपाठोपाठ आता सुप्रिया सुळे यांनीही घेतली कोरोनाची लस
‘शेंबड्या पोरानं केंद्रीय मंत्र्याला ठोकलं’; लेकाचं कौतुक करत हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना टोला
भररस्त्यात गाईचा जलवा; व्हिडिओ पाहुन तुम्हीही व्हाल थक्क!
Comments are closed.