बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

नवी दिल्ली | भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. यामुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच गरम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. अशातच आता चीनच्या आर्थिक पेचप्रसंगाच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वधारले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भारताही दिसून येत आहे.

भारतीय दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा दर मंगळवारी 269 रूपयांनी वाढून 45,776 रूपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.एचडीएफ सिक्युरिटीच्यानुसार रूपयाची घसरण हे त्याच्या मागचे कारण आहे. मागील व्यापारात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 45,497 रूपये होता.

चांदीच्या किमतीत सुद्धा आज जबरदस्त घसरणीचा कल दिसून आला. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 630  रूपयांनी वाढून  59 हजार 704 प्रति किलो झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत तेजी नोंदली गेली आणि ती 1759 डॉलर प्रति औंसवर पोहचली. तर चांदीचा दर  चांदी 22.58 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली आहे.

दरम्यान, दिवाळी ते डिसेंबर पर्यंत सोन्याची किंमत 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 14 हजार प्रति 10 ग्रॅम वाढू शकतात. त्यामुळे सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं.

थोडक्यात बातम्या-

‘माझ्या वडिलांना…’; एनसीबीकडे शाहरूख खानबाबत आर्यनने केलं मोठं वक्तव्य!

तालिबान्यांच्या ‘या’ नव्या फतव्यामुळे अफगाणिस्तानमधील तरूण मोठ्या संकटात!

महाराष्ट्राच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्याच्या नातीला ‘हा’ बॉलिवूड अभिनेता करतोय डेट???

केंद्राने गरिबांच्या खात्यावर 1 लाख कोटी पाठवले- नरेंद्र मोदी

ह्रदयद्रावक! शेतकरी गाडीच्या चाकाजवळ तडफडत होता, गाडीतून व्यक्ती उतरला अन्…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More