बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…

नवी दिल्ली | एचडीएफसी सिक्युरिटिजने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात गुरुवारी 358 रुपयांनी घसरण झाली आहे. आता सोन्याचे नवीन दर 45959 रुपये प्रति तोळा झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत विक्रीच्या दराने उच्चांक गाठला आहे त्यातच आता सोन्याचे भाव ही कमी होत असताना पाहायला मिळत आहेत.

सोन्याचे भाव कमी झाले असले तरी, चांदीच्या किमतीत 151 रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी 69008 रुपये प्रति किलो असलेली चांदी गुरुवारी 69159 रुपये प्रति किलो झाली आहे. आयात शुल्कामध्ये 5 टक्के कपात केल्यामुळे आता सोन्याचे भाव घसरताना दिसून येत आहेत.

सोन्याचे भाव हे जागतिक बाजारावर अवलंबून असतात आणि मागच्या वर्षी कोरोनाचे संकट जगावर घोंगावत असताना सोन्याच्या किमतीने विक्रमी नोंद करत 30 टक्क्यांनी वाढ झाली होती.

कमोडिटी मार्केटच्या तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांसाठी सोन्याचा उतरलेला भाव म्हणजे गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी आहे. येणाऱ्या काळात सोन्याचा भाव 56000 पर्यंत जाऊ शकतो असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याने मुंबईत हायअलर्ट

छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री पूजा चव्हाण प्रकरणावर गप्प का?- देवेंद्र फडणवीस

“मोदी हे महान आहेतच त्याविषयी शंका घेण्याचं कारण नाही, पण…”

नाना पटोलेंचा राष्ट्रवादी, शिवसेनेला इशारा, म्हणाले…

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More