बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोने इतक्या हजारांनी स्वस्त; जाणुन घ्या आजचा भाव!

नवी दिल्ली | ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. 56 हजार 200 रुपये प्रति तोळा झालेल्या सोन्याच्या किंमती आता तब्बल 12 हजार रुपयांनी स्वस्त होऊन 44 हजार 785 रुपयावर येऊन ठेपल्या आहेत. गेल्या वर्षभरातील हा सर्वात निचांकी आकडा आहे. 2021 सुरू झाल्यापासून अवघ्या तीन महिन्यात सोन्याच्या दरात 6 हजार रुपयांची कपात झाली आहे.

एमसीएक्सवर एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचे भाव 94 रुपयांनी घसरून 44 हजार 785 रुपये प्रति तोळ्यावर आले तसेच जूनच्या डिलिव्हरीसाठी 45 हजार 124 वर किमती येऊन ठेपल्या आहेत. देशावर कोरोनाचं संकट असताना 2020 या वर्षात सोने आणि चांदीच्या किंमतीनी गेल्या कित्येक वर्षांच्या किमतीची नोंद मोडून काढली होती.

सोन्याचा भाव सध्या कमी झाल्याने त्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोने खरेदीसाठी मागणी वाढल्याने आता पुढच्या काही महिन्यात सोन्याचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडू शकतात. अशी माहिती रॉयटर्सने आपल्या वृत्तात प्रकाशित केली आहे.

अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने आयात शुल्कात 2.5 टक्के कपात जाहीर केली त्यामुळे त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या बाजारावर थेट दिसून आला. तसेच येणाऱ्या काळात सोन्याच्या किमती या 42500 रुपयापर्यंत खाली येऊ शकतात. असा अंदाज केडिया कमोडिटीचे व्यवस्थापकीय संचालक अजय केडिया यांनी वर्तवला आहे.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी- चंद्रकांत पाटील

अंबानी स्फोटकं प्रकरणातील ‘ती’ कार मुंबई पोलिसांची; एनआयएच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर!

“सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”

“दैव जाणिले कुणी?” या उक्तीप्रमाणे ते चौघे मरणाच्या दारातून परतले, पाहा व्हिडिओ!

आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल- शरद पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More