Gold Rate: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर, वाचा आजचे ताजे दर
नवी दिल्ली | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी (Gold) करण्याकडे भारतीयांचा मोठा कल आहे, त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं.
रशिया-युक्रेन युद्धाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारात पाहायला मिळत आहे. यामुळे शेअर मार्केटवरही मोठा परिणाम झाला आहे. गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले असल्याचं चित्र आहे.
सराफा बाजारात आज सोने-चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज एप्रिल डिलीवरी सोने दरात 1.42 टक्क्यांची मोठी तेजी आहे. या वाढीमुळे सोने दर 51,000 वर पोहोचला आहे.
चांदीच्या दरातही आज तेजी आहे. चांदीचा भाव आहे 1.40 टक्क्यांच्या तेजीसह ट्रेड करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या(Gold, Silver Rate) दरात सातत्याने चढउतार होताना पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
Apple ची बंपर ऑफर; iPhone 13 वर मिळतेय ‘इतक्या’ हजार रुपयांची सूट
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फटका, होतील ‘हे’ गंभीर परिणाम
मोठी बातमी! पुतीनची युक्रेनवर सैन्य कारवाईची घोषणा
‘यापुढे आणखी घोटाळे बाहेर काढू’, वडिलांच्या अटकेनंतर सना मलिकचा आक्रमक पवित्रा
मोदी सरकारची अफलातून योजना, एकाच वेळी मिळणार 10 लाख
Comments are closed.