पुणे | हवेली तालुक्यातल्या गोल्डमॅन म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या सचिन शिंदे याला लोणीकंद ग्रामपंचायत कार्यालया समोरील एटीएमसमोर गोळ्या घालण्यात आल्या. सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली.
या गोळीबरात डोक्यात गोळी लागून शिंदे रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. त्याला जखमी अवस्थेत रुबी हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. सचिन शिंदे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असुन त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
ग्रामपंचायत कार्यालयातून काम करून एटीएम समोर सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना दुचाकीवरुन येत काही लोकांनी गोळीबार केला. परंतु अजूनही या घटनेचा गुन्हा दाखल झालेला नाही.
दरम्यान, सचिन शिंदे याला गोल्डमॅन म्हणुन सुध्दा ओळखळं जात होतं. सचिन शिंदेचे मारेकरी गोळ्या घालुन दुचाकीवरून फरार झाले.
थोडक्यात बातम्या –
आता मोदींनाच विचारायला हवं खरे मोदी कोण?- छगन भुजबळ
“कधी-कधी वाटतं, पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसची खरी गरज”
सचिन आणि लता मंगेशकर यांचा महाराष्ट्र सरकारला अभिमान वाटला पाहिजे- रामदास आठवले
बिग बाॅस फेम राहुल वैद्य दिशा परमारसोबत बांधणार लगीनगाठ!
‘शिवसेना हे आमचं जुनं प्रेम त्यामुळे…’; नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाईन गिफ्ट