बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हाफ चड्डी बदलली, डोळे मारण्याचे दिवस गेले’; युवकांना बोलताना उदयनराजेंनी मारला डोळा; पाहा व्हिडीओ

सातारा | भाजप खासदार उदयनराजे आपल्या खास शैलीसाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. सातारा नगरपरिषद निवडणुकीवरून सध्या साताऱ्यात जोरदार राजकीय वातावरण रंगलं आहे. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले या दोन भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार कलगीतूरा रंगलेला आहे. अशातच आता युवकांना संबोधित करताना उदयनराजे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.

सातारा शहराच्या विकासासाठी मला फक्त तुमची साथ पाहिजे. उदयनराजे म्हणजे तोंडाच्या वाफा नाहीत, हे बोला ते बोला, असा म्हणताच सभागृहात एकच टाळ्या आणि शिट्यांचा पाऊस पडला. हाफ चड्डी बदलली, डोळे मारण्याचे दिवस गेले, लाईन मारण्याचे दिवस आता संपले आहे, आता तरी कामाला लागायचं की नाही, असं म्हणत उदनयराजेंनी चक्क डोळा मारून दाखवला.

उदयनराजे यांच्या नेतृत्वात सध्या सातारा नगरपरिषदेत भाजपची सत्ता आहे. सातारा शहरातील कामांवरून शिवेंद्रराजे आणि उदयनराजे अनेकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काही दिवसांपुर्वी दोन्ही राजेंच्या समर्थकांमध्ये  झालेला सशस्त्र वाद सुद्धा राज्यभर गाजला होता. परिणामी येणाऱ्या सातारा नगरपरिषद निवडणुकीत भाजप दोन्ही नेत्यांना एकत्र कसं आणते हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, सातारा नगरपरिषदेत मला साथ द्या साताऱ्याचा विकास करून दाखवतो, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले आहेत. सातारा नगरपरिषदेत पुन्हा सत्ता मिळवण्याचं मोठं आव्हान उदयनराजे यांच्यासमोर आहे.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या 

“निर्णय तर मोदींचा होता पण, त्यामागे डोकं कोणाचं होतं?”

भारत-पाक सामन्याआधी ‘विराट-बाबरचं वाकयुद्ध’; विराट कोहलीचं जोरदार प्रत्युत्तर

“काही लोक गांजा मारून काम करतात, त्यांची नार्कोटेस्ट करावी”

निवडणुकीआधी भाजपला खिंडार! ‘हा’ मोठा नेता पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर

T-20 वर्ल्ड कपआधी सौरव गांगुलीचा टीम इंडियाला सल्ला, म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More