बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नशीब असावं तर असं! एकाच व्यक्तीला तब्बल दोन वेळा लाॅटरी, मिळाले ‘इतके’ कोटी

नवी दिल्ली | कधी कोणासोबत काय होईल याचा काही नेम नसतो. मग ती एखादी काही वाईट गोष्ट असो वा एखादी चांगली. कोणाचं नशीब कुठे, कधी फळफळेल काही सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे.

अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीला सात वर्षात तब्बल दोन लाॅटरी (Lottery) लागल्याचं समोर आलं आहे. या लाॅटरीमुळे त्या व्यक्तीचं नशीबचं पूर्णपणे बदलून गेलं. या लाॅटरी लागलेल्या व्यक्तीचं नाव विली टुली असून ते अमेरिकेच्या आयोवा राज्यात राहतात.

विली यांना आता $75,000 म्हणजेच जवळपास 55 लाख 88 हजार रुपयांचे लॉटरी जिंकली आहे. त्यामुळे त्यांचं नशीब चांगलंच फळफळलं आहे. एवढंच नाही तर याच व्यक्तीने 2014 मध्ये $2,00,000 म्हणजे तब्बल 1 कोटी 49 लाख रुपयांची लॉटरी जिंकली होती.

दरम्यान, दोन लाॅटरी लागल्यानंतर, एवढी मोठी रक्कम जिंकून खूप छान वाटतं. मागील वेळेपेक्षा या वेळी मला जास्त आश्चर्य वाटले. त्यामुळेच कदाचित मी लॉटरी अधिकाऱ्यांना म्हणालोही की, तुम्ही माझी मस्करी करत आहात का?

थोडक्यात बातम्या –  

लालपरी पुन्हा धावली! तब्बल ‘इतके’ कर्मचारी कामावर परतले

‘टोमॅटो पेट्रोलपेक्षाही महागलं’; वाढत्या महागाईवरुन शिवसेनेचे मोदी सरकारवर ताशेरे

“तात्काळ निलंबन करा, संविधान दिनी तरी…”, चित्रा वाघ कडाडल्या

‘…तर भाजपने आता आमच्यासोबत मिळून राज्य करावं’, राऊतांची खुली ऑफर

“तुमचं नेमकं धोरण काय? कोंबड्या वाचवणं की माणसं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More