बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुडन्यूज! छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदीत येतोय नवा सिनेमा, ‘हा’ अभिनेता महाराजांच्या भूमिकेत!

मुंबई | बाॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेकांच्या जीवनावर आधारित चित्रपट करण्यात आले आहेत. ‘जयलिला’ आणि ‘इंदिरा गांधी’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट आता चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात महाराजांची भूमिका अभिनेता शाहीद कपूर साकरणार असल्याचं समजत आहे.

शाहीद कपूरचा गाजलेला चित्रपट ‘कबीर सिंग’ याचे निर्माते अश्विन वर्दे आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट चे काम सुरु करणार आहेत. ‘लायका’ या साउथ चित्रपटसृष्टीतील बड्या प्रोडक्शन कंपनीसोबत त्यांनी हातमिळवणी केली आहे. अश्विन वर्दे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये महाराजांच्या भूमिकेसाठी शाहीद कपूरला विचारण्यात आलं आहे. तसेच शाहीदने या भुमिकेसाठी होकार दिल्याचे देखील समोर आलं आहे. याआधी ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात अभिनेता शरद केळकरने महाराजांची भूमिका साकारली होती.

‘योद्धा’ या चित्रपटात शाहीद दिसणार नसल्याचं काही दिवसांपुर्वीच समोर आलं होतं. मात्र या चित्रपटासाठी शाहीदने स्वतः नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. शशांक खेतान निर्देशित तसेच धर्मा प्रोडक्शन निर्मीत ‘योद्धा’ या चित्रपटात शाहीदसोबत दिशा पटानी लिड करणार होती.

दरम्यान, शाहीद कपूर त्याच्या ‘जर्सी’ या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण झाल्यानंतर ‘योद्धा’ या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार होता मात्र त्यासाठी आता शाहीदने नकार दिला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे निर्माते अश्विन वर्दे आणि शाहीद कपूर यांच्यात चर्चा सुरु असल्याचं कळत आहे.

थोडक्यात बातम्या-

चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केलेल्या त्या आरोपांना चाकणकरांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या….

तुम्ही मास्क घातलं नाही?; पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं धक्कादायक उत्तर

“मी भ्रष्ट नाही त्यामुळे भाजपवाले माझ्यावर 24 तास टीका करतात”

हरिश्चंद्रानं उद्धव ठाकरेंच्या रुपात पुनर्जन्म घेतला पण…- अतुल भातखळकर

रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिलेने लावला दिपीकाच्या पर्सला हात आणि त्यानंतर…,पाहा व्हिडिओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More