बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! लॉकडाऊननंतर फक्त 72 रूपयांमध्ये ‘या’ ठिकाणी राहायची सोय

नवी दिल्ली | कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. परिणामी बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन हटवण्यात आलं आहे. लॉकडाऊननंतर आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवले की कुठेतरी फिरायला जायचं जर तुमच्या मनात असेल. तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला फक्त 72 रूपयांमध्ये एका रात्रीसाठी रूम बुक करता येणार आहे.

फुकेत किंवा थायलँड निसर्गरम्य रोमँटिक ठिकाणं आहेत. भारतीय पर्यटकांची देखील या ठिकाणांना पसंती असते. वेगवेगळ्या देशातले लग्न झालेली जोडपे त्यांच्या हनीमूनसाठीही इथे येत असतात. इथले हॉटेल्स, बीच आणि एडव्हेंचर गेम याची सगळ्यांना ओढ असते. जर तुम्हालाही फुकेतला जायचं असेल तर लसीकरण आवश्यक आहे. कारण, जुलैपासून लस घेतलेल्या पर्यटकांना फुकेत खुलं होणार आहे.

तर, थायलॅंडमध्ये ‘वन नाईट वन डॉलर’ नावाचं कॅम्पेन सुरू करण्यात आलं आहे. तिथल्या पर्यटन परिषदेनं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे कॅम्पेन सुरू केलं आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून हॉटेलमध्ये राहण्याची सोय फक्त 1 डॉलर मध्ये म्हणजे 72 रुपयांमध्ये होणार आहे. पर्यटकांना 1 रात्रीसाठी 1 डॉलर मध्ये इथे रूम बुक करता येणार आहे.

दरम्यान, हॉटेल मधल्या याच खोलीसाठी याआधी थायलँडच्या चलनात 1000 ते 3000 म्हणजेच 2500 ते 7000 रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागायची. थायलँडमध्ये देण्यात आलेल्या ऑफरने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली तर, बँकॉक आणि समुईमध्येही ही ऑफर सुरू करण्यात येणार आहे. फुकेतमध्ये टप्प्याटप्प्याने पर्यटकांना येण्याची परवानगी देणार असल्याचं थायलँडचे पर्यटन प्राधिकरणाचे गव्हर्नर युथासाक सुपासोर्न यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

थोडक्यात बातम्या –

कौतुकास्पद! कोरोना काळात उपासमार होणाऱ्या 500 माकडांना पोलिस हवलदाराची मदत

ड्रामा क्वीन राखी सावंत बारीक होण्यासाठी करतीये प्रचंड मेहनत, पाहा व्हिडीओ

काँग्रेसला मोठा धक्का! ज्योतिरादित्य शिदेंनंतर या राज्यातील मोठा नेता भाजपच्या गळाला

“आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपत प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय”

नदी पार करण्यासाठी कोरोना योद्धांनी लढवली अनोखी शक्कल, फोटो होतोय व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More