बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मैदानावर पुन्हा आवाज घुमणार! प्रेक्षकांसाठी बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | येत्या 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांचा थरार रंगणार आहे. आयपीएलमध्ये कोरोनाची शिरकाव झाल्यानंतर आयपीएल सामने रद्द करावे लागले होते. त्यानंतर आता पुन्हा सामन्यांना सुरूवात होणार आहे. त्यातच आता आयपीएल चाहत्यांसाठी आनंदाची माहिती समोर आली आहे.

दुबई, शाहजा आणि अबू धाबी या तीन स्टेडियमवर आयपीएल सामने खेळले जाणार आहे. पहिला सामना मागील सत्रातील विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात खेळवला जाणार आहे. मागील वर्षी आयपीएल सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र आता या उर्वरित सामन्यात प्रेक्षकांना सामना पाहण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

आयपीएल सामने आमच्यासाठी खास असणार आहे, कारण आयपीएल आता त्यांच्या चाहत्यांचं स्टेडियममध्ये स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहे, असं आयपीएलने सांगितलं आहे. कोरोना परिस्थितीमुळे असणाऱ्या निर्बंधांमुळे असणारी चाहत्यांच्या उपस्थितीवरील बंदी उठवण्यात आली असल्याचं आयपीएलकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, येत्या 16 सप्टेंबरपासून आयपीएल सामन्यांसाठी तिकीट विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही आयपीएलचे उर्वरित सामने युएईत खेळवले जाणार आहेत. बीसीसीआय आणि युएई सरकारने प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

‘महाराष्ट्र एटीएस काय झोपलं होतं का?’; भाजपचा सवाल

“देशात भाजपसोबत स्पर्धा करण्याची क्षमता कोणत्याच पक्षात नाही”

भारताचा कधीही अफगाणिस्तान होणार नाही, हिंदू जगातील सर्वात…’; जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य!

राज ठाकरे भाजपच्या विरोधात बोलले होते की राष्ट्रवादीच्या हे…- रोहित पवार

उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ही ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची- जावेद अख्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More