बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रक्षाबंधनला भावाकडे जाऊ न शकणाऱ्या बहिणींसाठी खुशखबर! टपाल विभागाचा मोठा निर्णय

नाशिक | आता श्रावण महिना( Shravan Month) सुरू झाला की सणवार सुरु होतात. त्यात बहिण-भावाच्या नात्याला अतुट साक्ष देणारा सण म्हणजे रक्षाबंधन(Rakshabandhan) आहे. रक्षाबंधनाला बहिण कुठेही असली तरी  ती भावाकडे जाते आणि मोठ्या उत्सवात रक्षाबंधन साजरी करते. पण काही जणींना मात्र  रक्षाबंधनाला आपल्या भावाकडे जाता येत नाही त्यांच्यासाठी आता खुशखबर आहे, कारण टपाल विभागाने (Post Department) या वर्षी एक मोठा निर्णय घेतला आहे.

रक्षाबंधचे औचित्य साधून टपाल विभागाने एक वॉटरप्रूफ पाकीट तयार केले आहे. हे पाकीट स्पीड पोस्टद्वारे लवकरात लवकर पत्ता असेल तिथे पोहचणार आहे. हे पाकीट केवळ दहा रूपयाला उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या रक्षाबंधनाला प्रत्येक बहिण आपल्या लाडक्या भावाला राखी पाठवू शकणार आहे.

या निर्णयाची माहिती नाशिक(Nashik) डाक विभागाचे प्रवर डाक अधिक्षक मोहन आहिरराव यांनी मंगळवारी दिली. या वर्षीची एक खास बाब म्हणजे यावेळी पाकीटावर राखीचा उल्लेख असणार आहे. त्यामुळे राखीच्या पाकीटांचे वर्गीकरण करणे सोपे होणार आहे. तसेच या राखी वेळेवर पोहचवण्याच्या सूचना विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, असेही आहिरराव यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे देशात कुठेही वेळेवर राखी(Rakhi) पोहचणार आहे पण परदेशातही वेळेवर राखी पोहचणार आहे, त्यामुळे आता परदेशात जरी आपला भाऊ असला तरी तुमची रक्षाबंधन साजरी होईल. जिल्ह्यासह शहरातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे नाशिक डाक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

थोडक्यात बातम्या-

‘याच पालापाचोळ्यांनी इतिहास घडवलाय लक्षात ठेवा’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

“उद्धव ठाकरे दोनवेळा घरातून पळून गेले, त्यांना नारायण राणेंनी परत आणलं”

‘घरगुती कार्यक्रम एकदम ओक्के’, महामुलाखतीवरून चित्रा वाघ यांची टोलेबाजी

“…संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी”

‘आपलेच प्रश्न आपलीच उत्तरं, मुलाखत नाही हा घरचा मामला’; मनसेची तुफान टोलेबाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More