बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर! सलग चौथ्या दिवशी एकही कोरोना मृत्यू नाही

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट होत आहे. तर डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 44 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 89 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 5,04,330 इतकी आहे. तर पुण्यात 686 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 9,074 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज 4,098 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-

“पंतप्रधान मोदींनी लवकरात लवकर गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करावं”

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

“यंदा दिवाळीला भाऊबीज म्हणून गॅस सिलेंडर मागणार”

“नवाब मलिक म्हणजे बिघडे नवाब, माझ्या अंगावर कोणी आलं तर…”

याला म्हणतात झटपट निकाल! कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने घेतले शिंगावर; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More