‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पहिला प्रोमो आला समोर
मुंबई | ‘बिग बॉस मराठी’ (Big Boss Marathi) हा प्रेक्षकांच्या आवडतीचा ‘शो’ आहे. बिग बॉस मराठीचे तीनही सीझन सुपरहिट ठरले. त्यानंतर आता चौथा सीझन कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आता खुशखबर आहे. ‘बिग बॉस मराठीचा’ चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येँणार आहे. कलर्स मराठीने (Colors Marathi) पहिला प्रोमो शेअर करत याबद्दल माहिती दिली.
‘बिग बॉस’ मराठीचा तिसरा सीझन संपून बरेच दिवस झाले. मराठी कलाविश्वातील अनेक ओळखीचे चेहरे तिसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे या पर्वात कोणकोण सहभागी होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. कलर्स मराठीने मराठी मनोरंजनाचा बिग बॉस येतोय लवकरच तुमच्या भेटीला असं म्हणत हा प्रोमो प्रदर्शित केला.
बिग बॉस मराठीच्या तिनही सीझनचे होस्ट महेश मांजरेकर(Mahesh manjrekar) होते. पण त्यांनी तिसऱ्या सीझन मधील काही भागातून कर्करोगामुळे ब्रेक घेतला होता. त्यामुळे आता चौथ्या सीझन कोण होस्ट करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अशीही चर्चा आहे की,चौथा सीझन सिद्धार्थ जाधव होस्ट करणार पण अजुनही चौथा सीझन कोण होस्ट करणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आता हे जाणून घेण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
बिगबॉस मराठीच्या चौथ्या सीझनचे कोण स्पर्धक असणार याचीही प्रतिक्षा अनेकांना लागली आहे. यावरही अनेक चर्चा रंगल्या आहेत. अक्षय केळकर,निखिल चव्हाण,रूचिता जाधव, शुभांगी गोखले, मृणाल दुसानीस,अभिजीत आमकर,अनिता दाते, किरण माने हे स्पर्धक असणारं अशा चर्चा सध्या आहेत. पण अजूनही यावरं काही खुलासा झालेला नाही.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
‘त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड
‘पक्ष पळवला आता वडील पळवत आहात, तुम्ही बंडखोर नव्हे दरोडेखोर’; उद्धव ठाकरे आक्रमक
सूड, हल्लाबोल, गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित
मोठी बातमी! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…
Comments are closed.