मुंबई | पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) घवघवीत यश मिळालं. पाच पैकी चार राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली. गोवा विधानसभेच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं विधानभवनात जंगी स्वागत करण्यात आलं.
भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात फडणवीसांचं स्वागत केलं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ‘मिशन महाराष्ट्र’ची घोषणा केली. गोवा व उत्तर प्रदेशातील घवघवीत यशानंतर फडणवीसांचं कौतुक करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
शरद पवार जेष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही केलं तरी मीच केलं. माझ्यापेक्षा पुढे कोणी जाता कामा नये, असे शरद पवार आहेत. फडणवीस असे 10-12 पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा फडणवीस कितीतरी प्रगल्भ आहेत, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
दरम्यान, विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा आणि राष्ट्राच्या विरोधातील भूमिका शरद पवारांकडे आहे. असले विषय सोडून पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आहे, असा टोला पडळकरांनी लगावला. तर फडणवीस परमेश्र्वराने महाराष्ट्राला दिलेलं गिफ्ट आहे, असंही पडळकर म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! राणे पिता-पुत्रांची उच्च न्यायालयात धाव
‘देवेंद्र फडणवीसांचं मिशन महाराष्ट्र’, म्हणाले…
‘मी दु:खी होऊन बसत नाही,मी…’; तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘महाविकास आघाडी सरकार पडलं की…’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
“आम्ही आणखी लढू, कधी ना कधी यश येईल”
Comments are closed.