“जनाब संजय राऊत फडणवीसांच्या आरोपांमुळे बावचळले आहेत, त्यांचा झिंग झिंग झिंगाट झालाय”
मुंबई | राज्य सरकारनं नुकतच किराना दुकानात वाईन विक्रीस परवानगी दिली आहे. यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्राला ‘मद्य’राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं विरोधी पक्षाकडून म्हटलं जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
वाईन विक्रीवरुन वातावरण पेटलेलं असताना भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांमुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट ‘ झालं आहे, असं म्हणत पडळकरांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावं लागत आहे. गावच्या गावं अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला, असंही पडळकरांनी म्हटलं.
दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का? की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी देणार. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही, असं म्हणत पडळकरांनी आघाडी सरकारलाच प्रश्न केला आहे.
थोडक्यात बातम्या –
महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का?; आदित्य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
‘भाजप फ्लॉवर नाही तर फायर आहे’; पुष्पाचा डायलॉग ट्विट करत चित्रा वाघ यांची फटकेबाजी
“खुलेआम दारू विक्रीचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला बरखास्त करा”
Omicron विषाणू कितीकाळ जीवंत राहू शकतो?, अभ्यासातून महत्त्वाची माहिती आली समोर
“‘मद्य’राष्ट्र बनविण्यसाठी नेमकी कोणाशी डील झाली?”; फडणवीसांचा सरकारवर घणाघात
Comments are closed.