बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांना प्रमुख करणं म्हणजे लांडग्यानं मेंढरांचं नेतृत्व करण्यासारखं आहे- गोपीचंद पडळकर

पंढरपूर | मराठा आरक्षणावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. आता पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारनं हा मोठा निर्णय घेतला. मागासवर्ग पदोन्नतीच्या उपसमितीचं अध्यक्षपद उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आहे. यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नती आरक्षण उपसमितीचे प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करा, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी आहे का?, तर तान्ह्या बाळालाही विचारलं तर तेही सांगेल की हे जातीयवादी आहेत, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

मागासवर्गाचं दु:ख ज्या प्रतिनिधीला माहिती आहे अशा व्यक्तीला या उपसमितीचं अध्यक्ष केलं असतं तर समाजाला योग्य न्याय मिळाला असता. पण अजित पवार मागासवर्गीय पदोन्नतीच्या उपसमितीचे अध्यक्ष होणं म्हणजे मेंढरांचं नेतृत्व लांडग्यानं करावं आणि मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करा, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर टीका केली.

दरम्यान, हे सरकार आल्यापासून सव्वा वर्षात आरक्षणाचा बट्ट्याबोळ झालाय. मग ते मराठा समाज, धनगर किंवा मागासवर्गीय समाजाच्या पदोन्नतीमधलं आरक्षण असो. उपसमितीमध्ये चर्चा झाल्यानंतर समितीप्रमुखांनी माध्यमांना सांगायला हवं होतं की बैठकीत काय ठरलंय. मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण लगेच माध्यमांना माहिती देतात पण अजित पवारांनी तसं काहीच केलं नसल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“देवेंद्रजी काय राव तुम्ही कधीही मदतीला पोहोचता, मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना”

‘कोरोनामुळे आपण जवळची माणसं गमवलीत’; डॉक्टरांशी संवाद साधताना मोदी झाले भावूक

“सरकार आल्यापासून हवेत गेलेले उद्धव ठाकरेंचे पाय जमिनीवर आले, आनंद आहे”

धक्कादायक! डिस्चार्ज मिळण्याच्या काही तासांपूर्वी कोरोना रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या

सराईत गुन्हेगारांना फेसबुक पोस्ट महागात; पिंपरीतील ‘भाईचा बड्डे’ थेट पोलीस कोठडीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More