महाराष्ट्र मुंबई

“तेव्हा ढसाढसा रडणारे अजित पवार आता मोठा टग्या असल्याचा आव आणत आहेत”

File Photo

मुंबई | भाजपचे अनेक नेते आणि आमदार संपर्कात आहेत. ते केव्हा भाजपमधून इकडे येतील हे भाजपलाही कळणार नाही आणि येणाऱ्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, असं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी पवारांवर जोरदारा टीका केली आहे.

अजित पवार दिवसा दिवसाला बदलत राहतात. भाजपचे सरकारे होते तेव्हा तुम्ही अजित पवारांचे तोंड पहिले असेलच, नुसती नोटीस आली तर टीव्ही समोर ढसाढसा रडणारे अजित पवार आता मी मोठा टग्या आहे असा आव आणत आहेत, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरु असल्याचंही पडळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या काळातील अजितदादांची केविलवाणी अवस्था आम्ही पाहिली असल्याचं पडळकर म्हणाले. यावर अजित पवार काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून तर आम्ही 105 आमदार घरी बसवले आहेत- संजय राऊत

CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार; ‘या’ सरकारनं घेतला मोठा निर्णय

चारचाकी चालकांसाठी आनंदाची बातमी; सरकार लवकरच हा निर्णय लागू करणार!

अंबानींच्या ॲाफीसवर मोर्चा; बच्चू कडू, राजू शेट्टींसह ‘हे’ दिग्गज नेते होणार सहभागी

ृसोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; ‘या’ मुद्द्यांकडे वेधलं लक्ष!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या