बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली आता पुढच्या पिढ्यांची रोहित पवारांमुळे होईल”

अहमदनगर | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर उघडपणे टीका करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आमदार रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली. आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल, अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

श्रीगोंदा, कर्जतला हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेले रोहित पवार हे कामात कधीकधी तर श्रेय घेण्यात मात्र सर्वात आधी घेत असतात. त्यासोबतच रोहित पवार हे मुख्यमंत्री असल्यासारखे केंद्र सरकारवर टीका करत असतात, असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. पडळकरांनी ठाकरे सरकारवरही टीका केली.

महाविकास आघाडीमध्ये सगळा सावळा गोंधळ सुरु आहे. एका खात्याचा मंत्री दुसऱ्याच खात्याचा निर्णय जाहीर करतो. एखाद्या मंत्र्याने कुठला निर्णय घेतला तर तो मित्रपक्षाला मान्य नसतो. राज्य सरकारचा असा कारभार राज्यातील जनतेनं कधीही अनुभवला नव्हता, असं म्हणत पडळकरांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, राज्यातील आघाडी सरकार हे आरक्षण विरोधी आहे. मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणावरून या सरकारने मोठं षडयंत्र रचलं आहे, असं म्हणत सरकारमधील मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत असल्याचा आरोपही पडळकरांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात लहान मुले कोरोनाबाधित होण्याचं प्रमाण झपाट्याने वाढलं

मास्क न घालणाऱ्यांना झेडपी तिकीट नाही- सुप्रिया सुळे

‘100 कोटी घ्या अन् भाजपला विरोध करा’; आप आणि काँग्रेसची ‘या’ संताला ऑफर???

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 02 कोरोनाबाधितांचा मृत्यू

देवाची सावली! उद्यान एक्सप्रेससमोर झोपून देखील महिला जिवंत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More