बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो”

सांगली | सतत आपल्या भाषणांमधून आणि वक्तव्यांमधून चर्चेत रहाणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) गेला महिनाभर चाललेल्या सत्तानाट्यात कुठे अज्ञातवासातच गेले होते. त्यांचा कुठेच काही पत्ता नव्हता. भाजपचे इतर नेते दररोज प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. पण गोपिचंद पडळकर मात्र गायब होते. आता त्यांनी पुन्हा राज्याच्या सत्तांतरात उडी घेतली असून आल्या आल्या त्यांनी जयंत पाटलांना डिवचले.

क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकोडी (Krantiveer Nagnath Anna Naikodi) यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने वाळव्यात विविध कार्यक्रमांचे उद्घाटन झाले. यावेळी भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर आले होते, आणि त्यांनी भाषण दिले. या समारंभास माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) व आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) उपस्थित होते. यावेळी बोलताना पडळकरांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीका केली.

सत्ता गेल्याचे सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर असून शरद पवार (Sharad Pawar) कधी घरात बसतात आणि मी पक्ष सोडून जातो, अशी भावना जयंत पाटलांची आहे, अशी टीका पडळकरांनी केली. जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल करण्याचा प्लॅन केला होता. माझ्यावर देखील एका अपघात प्रसंगी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पोलिसांना मला अडकवायला सांगितले होते, असंही पडळकर म्हणाले.

माझ्या विरोधात हद्दपारीची नोटीस आहे. पण आम्ही घाबरलो नाही, रोज लढत राहिलो. 20 तारखेला विधान परिषदेचा निकाल लागला आणि शिवसेना आमदार सुरत गेल्याचे वृत्त आले. त्यानंतर जयंत पाटलांचा चेहरा बघा कसा, आजच्या तारखेपर्यंत त्यांचे सुतक गेलेेले नाही. जयंत पाटील सत्ता असेल तर काम करु शकतात. सत्तेच्या विरोधात ते काम करु शकत नाहीत, असा घाणाघात पडळकरांनी केला.

थोडक्यात बातम्या – 

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे भाज्या महागल्या; दर आणखी वाढण्याची भीती

रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली!

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शकाचा राहत्या घरी आढळला मृतदेह

सुष्मिता डेट करत असलेल्या ललित मोदीची संपत्ती आली समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

‘कॉफी विथ करण 7’ मध्ये जान्हवी कपूरचा मोठा खुलासा, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More