शरद पवारांचा ‘शकुनी काका’ असा उल्लेख करत पडळकरांचा हल्लाबोल, म्हणाले..
मुंबई | भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अनेकदा राष्ट्रवादी (NCP) व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यानंतर एसटी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकरांनी आणखी एकदा शरद पवारांवर टीका केली आहेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे.
शरद पवरांचा ‘शकुनी काका’ असा उल्लेख करत गोपीचंद पडळकरांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवारांचा कोटींची बँक व बँकेची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटींची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखलाय, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. बँकेची निवडणूक तर घोषित केली आहे पण जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढलाय, अशी टीकाही पडळकरांनी केली.
दरम्यान, एसटी कामगार उपाशी उघड्यावर लढा देत होते. मात्र, त्यावेळेस संघटनेचे सर्वेसर्वा यांनी माणुसकीखातर आपल्या सिल्वर ओकवरून एकवेळचं जेवण तर सोडा पण साधं चहापाणी पण पाठवलं नाही, असा टोला देखील पडळकरांनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
ट्विटरनंतर एलॉन मस्क खरेदी करणार ‘ही’ मोठी कंपनी, ट्विट करत म्हणाले…
खऱ्या आयुष्यातील जोडी मोठ्या पडद्यावरही एकत्र, ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटातील खास फोटो समोर
मोठी बातमी! या अटी-शर्तींसह राज ठाकरेंची सभा होणार?
राज्यात कोरोनाचे नवे variant आढळल्यानंतर राजेश टोपेंनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती
रशियाच्या इशाऱ्याला अमेरिकेकडून केराची टोपली, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed.