बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्या प्रश्नाचं किंबहुना उत्तर देणार का?’; गोपिचंद पडळकर यांचं उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी काही प्रश्न विचारले आहेत. इतिहासात उद्धव ठाकरे यांची नोंद खिल्ली उडवणारी होऊ नये, या उद्देशानं त्यांनी पत्र लिहित असल्याचं सांगितलं आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 12 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं त्यावरून पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम थांबवण्याचं आपण म्हटलात, उद्धवजी!  मंत्रालयासमोर 900 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला मनोरा आमदार निवास प्रकल्प थांबवून आपण तो निधी ऑक्सिजन आणि कोरोना लस खरेदीसाठी करणार आहात का? तसं केल्यास महाराष्ट्र आपलं कौतुकच करेल. आधी हा प्रकल्प 600 कोटीचा रुपयांचा होता. नंतर त्यात 100+100+100 अशी 300 कोटींची वाढ करण्यात आली, ती कशासाठी आणि कोणासाठी?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई मनपाकडे असलेल्या 79 हजार कोटींच्या बचत ठेवी वेळीच रयतेसाठी वापरल्या असत्या तर संपूर्ण राज्याचे लसीकरण झालं नसतं का? मुंबईबरोबरच राज्यातील लहानमोठी शहरे आणि ग्रामीण भागातही लसींचा तात्काळ पुरवठा केला जाईल असं आपण जाहीर का नाही करत?, असाही खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी कायदे रद्द करा आणि तसं केल्यास शेतकरी हे भारतीयाच्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी कार्यरत होतील, असं आपण मोदीजींना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे. उद्धवजी! म्हणजे काय बा? खरेच नाही समजलो. शेतकरी कायदे रद्द करण्याचा आणि शेतकऱ्यांनी अन्न पिकविण्याशी काय संबंध आहे?, असा देखील प्रश्न त्यांनी विचारला आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात मी आपणाला पत्राद्वारे काही सवाल केले आहेत. याचे पण उत्तर देणार का? किंबहूना देणार का?, असं पडळकर म्हणालेत.

पाहा पत्र-

थोडक्यात बातम्या-

गंगेच्या पात्रात 2 हजारपेक्षा जास्त मृतदेह, ‘या’ प्रख्यात वृत्तपत्राचा धक्कादायक दावा

“फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय”

कोरोना लसीमुळे सीरम मालामाल; नफ्याचा आकडा ऐकाल तर थक्क व्हाल!

‘जान मी तुझीच आहे पण…’; 17 वर्षीय मुलीचं आत्महत्येपूर्वी बॉयफ्रेंडला पत्र

आक्रमक हार्दिक पांड्याला भारतीय संघातून डच्चू, समोर आलं ‘हे’ कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More