बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दुकान कामगार, भाजीविक्रेते यांच्याही कोरोना चाचण्या करा; केंद्र सरकारचे निर्देश

नवी दिल्ली | किराणा मालाच्या दुकानातील कर्मचारी, भाजी आणि फळविक्रेत्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात याव्यात, असा आदेश केंद्र सरकारनं राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होऊ नये यासाठी सरकारनं याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

या भाजीविक्रेत्यांपैकी काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्यास संक्रमण वेगानं होऊ शकतं. यासाठी त्यांच्या कोरोना चाचण्या प्राधान्यानं करण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना केंद्राकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहीलं आहे. कोरोना रूग्णांसाठी असलेल्या रूग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची सुविधा असायला हवी. एखाद्या रूग्णानं संपर्क साधला असता किती वेळात रुग्णवाहिका पोहचतं आहे. यावर राज्यांनी बारिक लक्ष ठेवायला हवं. तसेच रुग्णवाहिका पाठविण्यास नकार देण्याचं प्रमाणही शून्यावर आणायला हवं, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान देशातील कोरोनाचा आकडा भयावह पद्धतीनं वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असल्यास सरकार आणि प्रशासनाला तातडीनं ठोस उपाययोजना करणं गरजेचं बनलं आहे. कोरोनाचा संसर्ग याच वेगानं वाढू लागला तर देशात सामुहिक संक्रमणाला वेळ लागणार नाही, अशी भिती आता काही तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाला रोखायचंच… राज्यात काल दिवसभरात 77 हजारांहून अधिक चाचण्या!

“ज्यांचं नाव वापरून सत्तेत आलात त्यांचा हाच पुतळा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही”

बारामतीत ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी…., अजितदादांच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना

प्रवीण दरेकर यांचा मुंबई महानगरपालिकेवर गंभीर आरोप, म्हणाले…

अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More