शिवरायांच्या पुतळ्यावर यंदा पुष्पवृष्टी नाही, शिवप्रेमींमध्ये संताप!

सातारा | शिवप्रताप दिनाला शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून मानवंदना करण्याचा शासनाला चक्क विसर पडला, असा दावा शिवप्रेमींनी केलाय. या शोकांतिकेमुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालीय.

प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्टवृष्टी करण्यासाठी हेलिकॉप्टरच आलंच नाही असा दावा केला जातोय. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच हा प्रकार घडलाय.

2005मध्ये अफजल खानाच्या कबरीचा वाद चिघळला होता. त्यामुळे शासनाच्या पुढाकारानं शिवप्रताप दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यास सुरूवात केली होती. हा देदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी हजारो शिवप्रेमी गर्दी करतात.