Top News

उद्यापासून 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर; 3 दिवस राज्याचं कामकाज होणार ठप्प

मुंबई | राज्यातील सर्व सरकारी कामकाज उद्यापासून 3 दिवस ठप्प राहणार आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात राज्यव्यापी संप पुकारला आहे.

7 ऑगस्टपासून हा संप सुरू होणार आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे प्रत्यक्ष लाभ अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे कर्मचारी आक्रमक होऊन हा संप करणार आहे. सातवा वेतनाकडे सरकार चालढकल करत आहे, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यातील सुमारे 17 लाख अधिकारी संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. सातवा वेतन आयोगाच्या मागणीसह सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण व दमबाजी करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणीही केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-खासदार हिना गावित मराठा मोर्चेकऱ्यांवर टाकणार अॅट्रॉसिटी!

-भाजप आमदाराला आधी काळे झेंडे दाखवले, नंतर त्याच झेंड्यांच्या दांडयाने मारलं!!!

-आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर महादेव जानकर भडकले!

-‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनाया ‘या’ कारणामुळं मालिका सोडणार

-…तर तुम्हालाही मुस्लिम बनवून दाढी ठेवायला लावू; आेवीसींची धमकी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या