Top News आरोग्य कोरोना देश

महाराष्ट्र सरकारने सामान्यांना केंद्रस्थानी ठेवून घेतले कोरोनाबाबत निर्णय, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक

संपूर्ण देशात कोरोनाचा धोका आहे. राज्यतंही कोरोनाची स्थिती अजून पूर्णपणे निवळली नाहीये. कोरोनासंदर्भात महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयांबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन सरकारचं कौतुक केलंय.

बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यामध्ये महाराष्ट्रासह 7 राज्यांचा समावेश होता. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ, हर्षवर्धन म्हणाले, “कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणं, प्लाझ्मा तसंच मास्कच्या दरांवर नियंत्रण आणणं, खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स राखीव ठेवणं तसंच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम’ यांसारखे चांगले अभिनव निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेत.”

महाराष्ट्र सरकारने घेतलेले हे निर्णय इतर राज्यांसाठीही उपयुक्त ठरतील, असंही केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

खेळ तर आता सुरू झालाय…; तुरुंगातून सुटल्यानंतर अर्णब गोस्वामींचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिट गुल.. कुठे गेला चमत्कार?; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

“बिहारमध्ये सत्ता स्थापनेसाठी नितीश कुमारांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा”

कोरोनाला सणवार-दिवाळी कळत नाही; मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त; ट्विटरवरून स्वतः दिली माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या