बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्र सरकारने आधार कार्ड पाहून रुग्णांवर उपचार करावे’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी

नागपूर | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच विदर्भातील नागपूरची कोरोनाची परिस्थिती ही गंभीर बनत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर देत कोरोना रुग्णांच्या उपचाराविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

नागपूरची कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयावह असून नागपुरात मध्य प्रदेशातील लोकही उपचार घेत असल्याने परराज्यातील रुग्णांना महाराष्ट्रातील बेड वापरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मनाई करावी, तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकारने आधार कार्ड पाहून रुग्णांवर उपचार करावे. अशी मागणी काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केली आहे.

आशिष देशमुख यांनी परराज्यातील रुग्णांना महाराष्ट्रात उपचार घेण्यासाठी बंदी घालावी, अशी मागणी केल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर केल्याचं पाहायला मिळालं. देशमुख म्हणाले की, पुण्या-मुंबईत जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहेत. पण विदर्भातही एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असताना एकही जम्बो कोव्हिड सेंटर इथे उभारण्यात आलं नाही.

“मुख्यमंत्र्यांनी मुंबईत आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात जम्बो कोव्हिड सेंटर उघडले. मग विदर्भातील आम्ही लोक माणसं नाही आहोत का? महाराष्ट्रातील रहिवासी नाही आहोत का?” असा प्रश्न काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी यावेळी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला असल्याचं पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! डोक्यात फरशी घालून सासऱ्याने केली सुनेची हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

आता 50 नव्हे तर इतक्या जणांच्या उपस्थितीतच उरकावं लागणार लग्न; वाचा काय आहेत नवे निर्बंध

दहावीची परीक्षा रद्द, बारावीची पुढे ढकलली, CBSE बोर्डाचा निर्णय

‘आगामी काळ अनिल देशमुखांसाठी कठीण असेल’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More