नागपूर | मी स्वत: विधान परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात स्थगन प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाच्या माध्यमातून मराठा आरक्षणावर चर्चा करा, अशी मागणी केली. मात्र, सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंंजय मुंडे म्हणाले.
आज मराठा आरक्षणासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे उद्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं ते म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे कुठलेही शाश्वत उत्तर नाही. याबाबत सरकारने अद्यापही मागासवर्गीय आगोयाकडे विचारणा केली नाही, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-शिवसेनेचा मोदींवर ‘विश्वास’; विश्वासदर्शक ठरावात भाजपला मदत करणार!
-भाजपला दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरायची हौस आहे- राज ठाकरे
-पोलिसांनी आतताईपणा केला तर जनावरांच्या अटकेची भूमिका घ्या!
-ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल- राजू शेट्टी
-काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट; म्हणे काँग्रेसला नक्षलवाद्यांचा पाठिंबा!