बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मन सुन्न करणारी घटना; आजीच्या दशक्रिया विधीदिवशीच नातवांचाही मृत्यू!

अमरावती | अमरावतीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. आजीच्या दशक्रिया विधीसाठी नदीवर गेलेल्या दोन सख्ख्या नातवांचा अंघोळ करताना नदीत बुडून मृत्यू झाला आहे. आजीचं दहादिवसांपूर्वी निधन झालं आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी या गावामध्ये ही घडली आहे. मनीष टोपमे आणि ईश्वर टोपमे असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावं आहेत.

ए्कीकडे दहा दिवसांपूर्वी आजीचा मृत्यू आणि त्यातच आता दोन तरुण मुलांवर काळाने घाला घातल्याने टोपमे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकारामुळे खानापूर गवळी गावात शोककळा पसरली आहे.

ममनीष आणि ईश्वर टोमपे हे दोघेही नदीत आंघोळीसाठी गेले. त्या दरम्यान नदीला जास्त पाणी असल्याने हे दोघेही भाऊ घाबरले. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच दोघेही नदीतील पाण्याच्या भोवऱ्यात आडकले आणि त्यांचा मृत्यू झालाय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना औरंगाबादेत घडली होती. शेततळ्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला होता. हे युवक सावंगी येथील शेतात फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर शेततळ्यात पोहताना पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता

थोडक्यात बातम्या-

“देशातील हर एक चौथा मुसलमान भिकारी आहे , ही माहिती अस्वस्थ करणारी”

“अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला”

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; झिका विषाणूचा पहिला रूग्ण आढळला ‘या’ शहरात

…वेळ आली तर सेनाभवन फोडू- प्रसाद लाड

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर; नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More