बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आजी वारल्याचं का सांगितलं नाही?’; तरुणाला दोघा आत्तेभावांकडून जबर मारहाण

पुणे | पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात एक विचित्र तक्रार नोंदवण्यात आली आहे. कोरोना काळात अंत्यविधीला जाण्यासाठी जास्त लोकांना परवानगी नसल्यामुळे नातेवाईक नाही तर अगदी जवळच्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अशातच एका तरुणाच्या आजीचा मृत्यू झाला. ही गोष्ट तरुणाच्या आत्ते भावांना समजल्यानंतर त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली.

संबंधित तरुणाचं नाव रोहन रमेश जाधव असं आहे. तसेच आरोपी दोन आत्ते भावांपैकी एकाचं नाव राम शाम पवार तर दुसऱ्याचं नाव गणेश शाम पवार असं आहे. राम आणि गणेश हे रोहनचे आत्ते भाऊ आहेत. रोहनची आजी वारल्यानंतर रोहनने त्याच्या आत्ते भावांना याबाबत न सांगिल्यामुळे दोघांना रोहनचा प्रचंड राग आला. याच रागातून दोघांनी रोहनला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

दोघे आत्तेभाऊ इतर जणांना घेऊन रोहन जवळ गेले. यादरम्यान तुझी आजी वारल्यानंतर आम्हाला का सांगितलं नाही, तुला फार माज आला आहे, तुला नेऊन आता मारुनच टाकतो, अशी धमकी आरोपींनी रोहनला दिली. यानंतर आरोपींनी रोहनला शिवीगाळ करुन गणेशने बांबूने तर रामने हाताने मारहाण करण्यास चालू केली. तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या इतरांनी लोखंडी राॅडने तर एकाने दगडाने रोहनला मारहाण केली.

दरम्यान, मारहाणीमध्ये रोहन गंभीर जखमी झाला. त्यानंतर रोहनने हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. मारहाण चालू असताना मला मारु नका मी मरेन अशा शब्दात रोहनने विनंती केली. मात्र आरोपींनी त्याचं काहीही ऐकलं नाही.

थोडक्यात बातम्या-

ईडी अधिकारी असल्याची बतावणी करत बाजार समिती संचालकांकडे मागितली खंडणी

येत्या 3 दिवसांत ‘या’ भागांमध्ये कोसळणार धोधो पाऊस; हवामान खात्याचा इशारा

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघ करणार ‘या’ देशाचा दौरा; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने केला खुलासा

कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन करायला गेले 100 जण, 21 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ

देशभरात 1 लाख बनावट रेमडेसिवीर विकले, पोलीस तपासात आणखीही अनेक धक्कादायक खुलासे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More