राणे पिता-पुत्रांना मोठा दिलासा; न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई | दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याप्रकरणी राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आज न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
दिशा सालियन प्रकरणी गुन्हा दाखल होताच राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. या सुनावणीत दिंडोशी न्यायालयानं जामीन अर्ज मान्य केला असून राणे पिता-पुत्रांना दिलासा दिला आहे.
न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं स्वागत करुन, पुढेही अन्यायाविरुद्ध असाच आवाज उठवत राहू, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राणे पिता-पुत्र आक्षेपार्ह वक्तव्य करुन दिशा सालियनची बदनामी करत आहे, असा आक्षेप घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगात धाव घेतली होती. त्यानंतर महिला आयोगाच्या निर्देशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
थोडक्यात बातम्या –
‘द काश्मीर फाईल्स’ पाहिल्यानंतर कंगनानं बॉलिवूडकरांना मारला टोमना, म्हणाली…
“राज्यातल्या अजून 10 नेत्यांना राजीनामा द्यावा लागणार”
‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी सुनावलं, म्हणाले…
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचं जगाला भावनिक आवाहन, म्हणाले…
सकाळचा चहा ठरू शकतो घातक, वाचा ‘हे’ गंभीर परिणाम
Comments are closed.