बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराट कोहलीला मोठा दिलासा, रोहित शर्मानं उधारीवर दिला आपला ‘हा’ खेळाडू!

मुंबई | सध्या आयपीएलच्या पाँईन्ट्स टेबलच्या टाॅपवर आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ पोहचला आहे. संघाच्या धारदार गोलंदाजीनं आरसीबीला अव्वल स्थानी पोहचवलं आहे. पण त्याच आरसीबीला आता गतविजेता संघ मुंबई इंडियन्सकडून एक गोलंदाज मागावा लागत आहे. आरसीबीने संघात सामिल करून घेतलेल्या केन रिचर्डसन आणि एडम झम्पा यांनी संघाला टाटा केल्यानं आता आरसीबीने मुंबई इंडियन्सकडून एक गोलंदाज उधारीवर घेतला आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ विराट कोहलीच्या आरसीबीच्या मदतीला धावला आहे. मुंबई इंडियन्सने आपला एक खेळाडू आरसीबीला दिला आहे. मुंबईच्या टीममध्ये सध्या राखीव खेळाडू म्हणून असलेला स्कॉट कुगलाईन याला बंगळुरूने त्यांच्या टीममध्ये घेतलं आहे. लवकर स्कॉट कुगलाईन मुंबईच्या स्काॅडमधून बंगळुरूकडे येणार आहे.

बंगळुरूच्या टीममध्ये असलेले केन रिचर्डसन आणि एडम झम्पा हे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात कोरोना रूग्णसंख्येच्या भीतीमुळे ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता, यानंतर आता बंगळुरूच्या कोचने स्कॉट कुगलाईनची संघात निवड केली आहे. सध्या आरसीबीचा संघ चांगली कामगिरी करत आहे. हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज आरसीबीला सामना जिंकवून देत आहेत. त्यामुळे स्कॉट कुगलाईन सामना खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, न्यूझीलंडचा स्कॉट कुगलाईन याआधीही दोनदा आयपीएलमध्ये खेळला होता. चेन्नई सुपरकिंग्स संघाने त्याला 2019 साली संधी दिली होती.कर्णधार धोनीने त्याला दोन सामन्यांमध्ये संधी दिली होती, त्यात त्याने 2 विकेट घेतल्या होत्या. पण त्याने आयपीएलमध्ये एकही धाव केली नाही. स्कॉट कुगलाईनने न्यूझीलंडकडून 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

थोडक्यात बातम्या-

दोन मुलं असलेल्या आईच्या प्रियकरासोबत तिच्या पतीने केलं धक्कादायक कृत्य

‘मोक्का’ लागलेल्या महिला वकिलाची ससूनच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

कोव्हिड केअर सेंटरमध्ये महिला डाॅक्टरकडे केली शरीरसुखाची मागणी; आरोपीला अटक

बारावीच्या परीक्षांबाबत राज्य शासनाचा ‘हा’ मोठा निर्णय 

गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो, एकनाथ खडसेंच्या व्हायरल क्लिपने खळबळ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More