…तर गुजरातमध्ये येऊ शकते काँग्रेसची सत्ता!

गांधीनगर | गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मनासारखी खाती न मिळाल्यानं भाजपला रामराम करण्याचे संकते दिलेत. त्यामुळे कष्टानं मिळावलेली गुजरातची सत्ता भाजपच्या हातून जाण्याची परिस्थिती निर्माण झालीय. 

नितीन पटेल यांची नाराजी लक्षात घेऊन हार्दिक पटेल यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिलीय. सोबत 10 आमदार घेऊन या, मनासारखी खाती देऊ, असं हार्दिकने म्हटलंय. 

भाजपला नितीन पटेलांची नाराजी दूर करण्यास अपयश आलं आणि हार्दिकच्या आवाहनाला प्रतिसाद देत ते काँग्रेसमध्ये आले तर भाजपला गुजरातची सत्ता गमवावी लागू शकते. भाजपसाठी ही धक्कादायक परिस्थिती असल्याने गुजरातमध्ये सध्या वेगवान घडामोडी सुरु आहेत. 

गुजरातचं सध्याचं पक्षीय बलाबल-

भाजप – 99

काँग्रेस – 77

राष्ट्रवादी – 1

BTP- 2

अपक्ष – 3