Top News

“सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम, शॉक दिल्याशिवाय बेताल बडबड थांबणार नाही”

जळगाव | सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांचे बेताल वक्तव्य थांबणार नाहीत, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलाय. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

किरीट सोमय्या हे बेताल बडबड करत आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांनी ठाण्यातील रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. त्यांची ही बडबड शॉक दिल्याशिवाय थांबणार नाही, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

ठाकरे कुटुंबीयांच्या पायाजवळ बसून सोमय्या खासदार झाले. आज ते ठाकरे कुटुंबावरच टीका करत आहेत. हा माणूस प्रचंड एहसान फरामोश आहे, अशी सडकून टीकाही गुलाबराव पाटील यांनी केलीय.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कथित जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरेंनी शपथविधीनंतर 345 कोटी बिल्डरला गिफ्ट दिले”

“ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?”

‘मत खाणाऱ्यांबाबत भाजपने निर्णय घ्यावा’; नितीश कुमारांचा चिराग पासवानांवर हल्लाबोल

…म्हणून ट्विटरकडून काही तासांसाठी अमित शहा यांचा प्रोफाईल फोटो ब्लॉक

ठाकरे कुटुंबावरील आरोपांनंतर संजय राऊतांची किरीट सोमय्यांना वॉर्निंग, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या