जळगाव महाराष्ट्र

“आजोबा म्हणून शरद पवारांना पार्थ पवार यांचा कान पकडण्याचा अधिकार आहे”

जळगाव | शरद पवारांना आजोबा म्हणून पार्थ पवार यांचा कान पकडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या विषयावर होणारी टीका चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या वादावरुन नाहक राजकारण सुरू आहे. शेवटी शरद पवार हे सर्वेसर्वा आहेत. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात राजकारणाच्या पलीकडे नाते आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीचे सरकार पडणार, असा दावा भाजपकडून कितीही सुरू असला तरी त्याला काहीही अर्थ नाही. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचा हा दावा सुरू आहे, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘भारत आणि चीन हे दोन महान देश….’; चीननं भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही- देवेंद्र फडणवीस

‘ही’ भारतीय कंपनी खरेदी करू शकते टिकटॉक

पवार कुटुंबातील प्रश्न एका मिनिटात सुटेल- राजेश टोपे

कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या जीवनावर येणार वेबसिरीज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या