जळगाव | आमच्यावर टीका केल्याशिवाय ते महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाहीत, आणि जे आमच्यामुळे मोठे झाले त्यांनी आमच्यावर टीका करू नये, अशा शब्दांत पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटलांनी भाजपवर निशाणा साधलाय.
राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. त्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून या बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर गुलाबराव पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर सातत्याने टीका केली जात आहे. याला गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी जळगाव जिल्ह्यात मात्र काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिलाय.
थोडक्यात बातम्या-
‘संघर्षातून वर आलेल्या धनंजयने आज ते मिळवून दिलं’; सिंधुताईंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार
ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही- देवेंद्र फडणवीस
अहो दादा, असं मुघलांसारखं काय बोलता?- अमोल मिटकरी
“मुंबईकर टॅक्स भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात”
राज्य सरकारच्या ‘त्या’ चुकीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे- रावसाहेब दानवे