बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भान हरवलेल्या नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे”

जळगाव | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली. यानंतर आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिलेत.

उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंनी टीका केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते आक्रमक झाले असून शिवसेनेने नारायण राणेंवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर बोचरी टीका केली आहे.

भान हरवलेल्या नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे, अशी टीका गुलाबराव पाटलांनी नारायण राणेंवर केली आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या व्यक्तीने राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय बोलावं याचं भान ठेवलं पाहिजे. मात्र, हे भान हरपलेल्या नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्याविरोधात महाड आणि नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 153, 189, 504, 505(2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“…म्हणून मुस्लिमांसाठी भारत सर्वात सुरक्षित देश”

“उद्धव ठाकरेंविरूद्ध अपशब्द वापरणाऱ्यांचे हात छाटण्याची शिवसेनेत धमक”

नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश, मुख्यमंत्र्यांविरोधातील वक्तव्यानंतर राज्यभरात गुन्हे दाखल

‘कुठल्याही किंमतीत गुडघे टेकणार नाही’; पंजशीरमध्ये अहमद मसुदची तालिबान्यांना तगडी टक्कर

“आम्ही महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहोत, त्यांचा गुलाम नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More