महाराष्ट्र

“पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या पाहीजेत, मग राजकारणात मजा येईल”

जळगाव | एकनाथ खडसे यांनी आज अखेर शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावर सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. ते जळगावमध्ये बोलत होते.

2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे भाजपच्या उमेदवार होत्या. तेव्हा शिवसेनेने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता, असं गुलाबराव पाटलांनी सांगितलं.

युती असतानाही आणि युती नसतानाही शिवसेनेने मुंडे कुटुंबासोबतचे नातं जोपासलं आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसेंप्रमाणे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला पाहीजे, म्हणजे राजकारणात मजा येईल, असं गुलाबराव पाटील म्हणाले.


महत्वाच्या बातम्या-

‘मला दिल्लीतल्या वरिष्ठांनीच सांगितलं की…’; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देऊ- शरद पवार

पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की…- एकनाथ खडसे

भाजपसाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करेन- एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या