बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी डंके की चोटपर सांगतोय, शरद पवारांनी विश्वासघात केला”

मुंबई | एसटी महामंडळाचं शासनात विलीगीकरण व्हावं, या प्रमुख मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचारी (ST Workers) संपावर आहेत. अशातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घोषित केला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार (Gunaratna Sadavarte criticizes NCP supremo Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे.

केवळ पगार वाढ मान्य नाही. सरकारने हे घाणरडं राजकारण केलंय. जुलमी सरकारचं हे राजकारण आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी फसवणूक झाली आहे. एसटीचं विलीगीकरण करावं हीच आमची स्पष्ट मागणी आहे, असं अॅड गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी कष्टकरांच्या विश्वासघात केला आहे, हे मी डंके की चोटपर सांगतो, असं सदावर्ते म्हणाले आहेत. दत्ता सामंत यांच्या हत्तेनंतर आता कर्मचाऱ्यांना टोडण्याचं काम शरद पवार यांच्या टोळीने केलं आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, सरकारने फसवणूक केली आहे. सरकारचा निर्णय मान्य नाही. हे सरकार किती चुकीचं असू शकतं याचं उदाहरण म्हणजे आजची ही पत्रकार परिषद आहे, असंगी सदावर्ते म्हणाले आहेत. त्यावर आता राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

भारी काम झालं! रेशनधारक कुटुंबांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

भर पत्रकार परिषदेत अनिल परब यांचा पडळकरांना टोला, म्हणाले…

एसटीचं विलीनीकरण नाहीच, कर्मचाऱ्यांचं निलंबन मात्र तातडीने रद्द होणार

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ; अनिल परब यांची घोषणा

डीजेच्या आवाजामुळे 63 कोंबड्यांचा मृत्यू, मालकाने थेट पोलीस स्टेशन गाठलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More