बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाहीच; 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवली

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर आता वेगवान घडामोडी घडत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडी वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.

सदावर्तेंनीच पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी सदावर्तेंवर लावला आहे. राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. सरकारी पक्षाची बाजू मांडताना वकीलांनी सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती.

आता सदावर्तेंना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रकरणानंतर राज्यात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली होती.

दरम्यान, सदावर्तेंवर दंगल घडवण्याचा प्रयत्न करणे, कायदा व सुव्यवस्था मोडणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्तेंचे वकिल त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

अनुष्का शर्माला आवडली हिरव्या वाटाण्याची भाजी अन् आळूची वडी; फोटो शेअर करत म्हणाली…

“शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यास ठाकरे सरकार जबाबदार”

ईडीच्या कारवाईने दिल्लीत गोंधळ; काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची चौकशी सुरू

राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

देशातील कोरोना रूग्णांबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More