Top News

“दहा लाखांचा सूट घालून गांधीजींचं नाव घेणं हाच मुळात विरोधाभास”

मुंबई | आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो. सामान्य माणूस त्यांच्या जवळ सहजपणे जाऊ शकत होता. एक धोती आणि पंचा घालून फिरणाऱ्या या साध्या माणसाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा लाखाचा सट घालून फिरतात. ही देशाला शोभा देणारी गोष्ट नाही, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी एच. के. पाटील यांनी केली आहे. ते लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

महात्मा गांधींच्या आयुष्याशी तुलना करताना जाणवणारा हा मोठा विरोधाभास आहे. आम्ही ‘स्वच्छ भारत अभियानात’ गांधीजींचा चष्मा वापरतो. त्यांच्या काठीचाही वापर प्रतीकात्मकरीत्या करतो. कृती मात्र भलतीच करतो. हा मोठा विरोधाभास आहे, असं एच. के. पाटील म्हणाले.

‘स्वच्छ भारत अभियान’ हा काही नवीन कार्यक्रम नाही. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘निर्मल भारत’ची कल्पना मांडली. त्यात मोठे काम केले. पण मोदी सरकारने पुढे त्याचे नाव बदलून ‘स्वच्छ भारत अभियान’ केले. नाव बदलले तरी चालेल पण देशात त्यासाठी काम झाले पाहिजे, असंही एच. के. पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात परतीच्या पावसाचं थैमान; अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, वीजही गायब

परतीच्या पावसाने सोलापुरात हाहाकार; अनेक ठिकाणी पूरस्थिती

…तर सत्य बाहेर येणं महत्वाचं आहे- छगन भुजबळ

…अन् ‘मी लाभार्थी’ जाहिरातीचा खर्च भाजपकडून वसूल करा- सचिन सावंत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या