खेळ

“भारतीय संघात हा खेळाडू असता, तर भारत 2019 चा विश्वचषक जिंकू शकला असता”

नवी दिल्ली | जर 2019 च्या विश्वचषकात भारतीय संघात अंबाती रायडू असता तर भारत हा विश्वचषक जिंकू शकला असता असं मत माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने म्हटलं आहे.

अंबाती रायडू चौथ्या क्रमांकावर खेळायला हवा होता. एकदिवसीय विश्वकप 2019 साठी अंबातीला भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं. इतकंच नाही तर संपूर्ण मालिकेत संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले, मात्र त्यानंतरही अंबातीला संधी दिली गेली नाही. यानंतर अंबाती रायडूने निवृत्ती घेतली.

अंबाती रायडूचं टेस्टमध्ये फेल होणं आण त्याला संघात स्थान न मिळणं याने मी आनंदी नव्हतो. अंबातीला फेल केल्यावर मला त्याच्या जागेवर संघात घेण्यात आलं होतं. त्यामुळे मला वाईट वाटत होतं, असं रैनाने सांगितलं आहे.

दरम्यान, अंबाती भारताच्या संघात चौथ्या क्रमांकाचा फलंदाज असायला हवा होता. कारण तो खूप मेहनत घेत होता. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली होती तेव्हा तेव्हा त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. मात्र तरीही त्याला संघात स्थान मिळाले नव्हते, असं रैना म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-

6 तासांपेक्षा अधिक वेळ सीबीआयद्वारे सुशांतच्या घराची तपासण

‘हो…दाऊद इब्राहिम आमच्याच देशात’; अखेर पाकिस्तानने दिली कबूल

राज्यात कोरोनाचा वाढता आकडा, पाहा आजची सविस्तर आकडेवार

दिल्ली-उत्तर प्रदेशात बॉम्ब स्फोटाचा कट; पकडलेल्या आयसीसच्या अतिरेक्याचा मोठा खुलासा

प्रवासी, मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीबाबत केंद्राचा मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या