बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हमाम में सब नंगे है कारण, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…”

मुंबई | राज्यात सध्या मुंबईतील कथित क्रूझ प्रकरण चांगलंच राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं आहे.‌ राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिच्या अनुषंगाने काही गंभीर आरोप केले आहेत. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

हमाम में सब नंगे हैं. कारण काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत. आमच्या पण हातात दगडं आहेत, असा चिमटा संजय राऊत यांनी भाजपला घेतला आहे.

ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे. एकमेंकावर आरोप करणं सुरू आहे. एकमेकांना खोट्या आरोपात फसवणं सुरू आहे. केंद्रीय चौकशी समितीचा गैरवापर करणं सुरू आहे. यापूर्वी असा कधी घडलं नाही. मात्र आता या दोन वर्षात असे प्रकार वाढले आहेत. हे महाराष्ट्रातील राजकारण नाही. आता यात शरद पवारांना यात ओढलं जात आहे.‌ भाजप नेत्यांना लाज वाटली पाहिजे. आपल्या राजकारणासाठी पवारांसारखा मोठ्या नेत्यांवर टीका करत आहे, असा संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, राजकारण म्हणल्यावर हमाम में सब नंगे होते है‌. मलिक यांनी काही पुरावे सादर केले आहेत.‌ मी विरोधकांना सांगू इच्छितो की, आम्ही तुमच्या एवढे खाली येणार नाही.‌ आम्ही कमरेखालचा वार केला नाही. आम्ही पवारांनी संस्कार असलेलं राजकारण केलं आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“नवाब मलिक याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करा”

“एवढं गलिच्छ राजकारण ठाकरे-पवारच करू शकतात, नवाब मलिकांची एवढी कॅपेसिटी नाही”

दिवाळीच्या सणावर पावसाचं सावट; राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मोठी बातमी! अखेर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर

‘त्यांनी सुरुवात केली आहे, मी शेवट करेल’; देवेंद्र फडणवीस आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More